Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या या उभ्या फुटीमुळे सध्या राष्ट्रवादी पक्ष हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. पक्षात सुरू असलेल्या या उलथापालथीदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट खास आपल्या मुलीसाठी लिहिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट आपली मुलगी रेवतीसाठी लिहीली आहे. सुळे यांनी आपली मुलगी रेवतीचा फोटो शेअर करत एक भावनिक संदेश लिहीला आहे. ज्यामध्ये त्या म्हणतात ' आम्हा दोघांना तुझे आई-वडील असल्याचा अभिमान वाटतो. आमची मलगी रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून मास्टर पूर्ण केलं आहे. तीनं एमपीएची पदवी मिळवली आहे. आम्ही तुझ्या पदवीदान समारंभाला येऊ शकलो नाही याचं वाईट वाटतं' असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
