#

Advertisement

Friday, July 7, 2023, July 07, 2023 WIB
Last Updated 2023-07-07T11:03:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : पोलिसांनी सीएला घेतलं ताब्यात

Advertisement

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी अतिष ओमप्रकाश काबरा या सीएला ताब्यात घेतलं आहे. 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलं आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्विटर अकाऊंटवरून एक आक्षेपार्ह कमेंट  करण्यात आली होती. अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचं लक्षात येताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपास करत याप्रकरणात एका सीएला ताब्यात घेतलं आहे.