#

Advertisement

Friday, July 7, 2023, July 07, 2023 WIB
Last Updated 2023-07-07T10:44:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आढळराव पाटील शरद पवारांच्या संपर्कात ?

Advertisement

पुणे : शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मात्र आढळराव पाटील जरी दार ठोठावत असले तरी त्या दाराच्या किल्ल्या आपल्याकडे असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर खरमरीत टीका केली होती , त्यांच्या टीकेला उत्तर देताना कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तुमचे छंद तसे आहेत का ?असा सवाल करत कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पाण्यात म्हैस अन् बाजारात मोर अशी परिस्थिती आहे. आढळराव पाटील बोलतात एक अन् करतात दुसरंच. ते आता पवारांच्या संपर्कात आहेत असा दावा कोल्हे यांनी केला  आहे.