Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्याने पक्षात फूट पडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या समर्थनार्थ आमदार-खासदारांची 40 पेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. शरद पवार कॅम्पने निवडणूक प्राधिकरणाकडे कॅव्हेट दाखल केले असून गटबाजीच्या संदर्भात कोणतेही निर्देश देण्यापूर्वी प्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.
