Advertisement
अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे प्रदेश सचिव ईश्वर क्षीरसागर यांची माहिती
उस्मानाबाद : अनुसूचित जाती आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डी.डीओ कोड करिता व एन.टी. विभागातून एस.सी सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यासाठी मंत्रालयात अनेक दिवसापासून फाईल सादर करण्यात आली होती. सदर फाईलचा पाठपुरावा बर्दापूर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सचिन बनसोडे मंत्रालयात करीत होते. परंतु, सरकारी काम अन् जरा थांब, असा अनुभव येत होता, अखेर सदर बाब अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे प्रदेश सचिव ईश्वर क्षीरसागर यांनी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना सांगितली. यातील गांभीर्य लक्षात घेत खुद्द ढोबळे यांनी यामध्ये लक्ष देत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना करीत एका दिवसात सदर फाईलचे काम मार्गी लावले.याबाबत ईश्वर क्षिरसागर यांनी सांगितले की, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पुढाकाराने दिनांक 5 जुलै 2023ला अनुसूचित सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव डिगळे व आवरसचिव अहिरे यांच्यासमोर फाईल घेऊन फाईल वर मंजुरी घेण्यात आली. यानंतर सदरील फाईल अधिकारी कोटे यांना सादर करण्यात आली. दि, 6. जुलैला कोटे यांच्याकडील फाईल तयार करून ती आयआयटीचे कैलास मुंडे यांच्याकडे सादर करण्यात आली. त्यानंतर माननीय मुंडे यांच्याकडून फाईल तयार करून ती दिव्यांग विभाग श्रीमती कडू यांच्याकडे सायंकाळी 5 वाजता सादर करण्यात आली. सदर फाईल मुंडे व श्रीमती कडू यांच्याकडून तयार करून 6 वाजता उपसचिव घोडके यांच्याकडे सादर करण्यात आली. सायंकाळी 6.30. वाजता माननीय उपसचिव घोडके यांची भेट घेऊन फाईलवर सही घेऊन मंजूर करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता सदर फाईल एन.टी विभागाकडून सामाजिक न्याय एस.सी. विभागाकडे वर्ग करून मंजूर करून अप्रोल घेऊन मल करण्यात आला आणि एवढ्या दिवस रखडलेला अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याना वेतनाबाबतचा प्रश्न लक्ष्मणराव ढोबळे यांच्यामुळे सुटण्यास मदत झाली.
