#

Advertisement

Saturday, July 8, 2023, July 08, 2023 WIB
Last Updated 2023-07-08T13:42:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सत्तेच्या खेळात शेतकऱ्यांचे मरण : ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्‍त केली खंत

Advertisement

मंगळवेढा : राज्याच्या राजकीय पटलावर शहकाटशहाचं राजकारण रंगत आहे. दररोज एखादा राजकीय भूकंप होत आहे. मात्र, या राजकारणात राज्य सरकार गरीब शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. 2022 मध्ये आत्महत्या झालेल्या एकूण 309 शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार होती, परंतु, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारे अनुदान जानेवारीपासून रखडल्याचे धक्कादायक वास्तव आहे. निधीची घोषणा मोठ्या थाटामाटात झाली. मात्र निधीच उपलब्ध झालेला नाही. सत्तेच्या खेळात शेतकऱ्यांचे मरण होत आहे, अशी खंत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्‍त केली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचीत असल्याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याबाबतची खंत व्यक्‍त केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबणार कधी? असा सवाल करीत त्यांनी बीड-98, धाराशिव-80, नांदेड-64, संभाजीनगर-50, परभणी-32, लातूर-28, जालना-25, हिंगोली-13 अशी आकडेवारीच कळविली आहे. याशिवाय अनुदानासाठी पात्र-अपात्रतेचा मुद्दा बाजूला ठेवला तर मोठ्या संख्येने आत्महत्याग्रस्तांची कुटुंबं मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र बेरजेच्या राजकारणात गुंतलेले दिसत आहेत. बळीराजाला कुणीच वाली नाही का? हा सवालही ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी उपस्थित केला आहे.
पूर्व विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपला तरीही विदर्भात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचेही ऍड. कोमलताई यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.