#

Advertisement

Friday, July 7, 2023, July 07, 2023 WIB
Last Updated 2023-07-07T10:30:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नीलम गोऱ्हेंनी सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश

Advertisement

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
नीलम गोऱ्हे यांनी आज ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या आणि विश्वासू म्हणून ओळखल्या जायच्या. मात्र ठाकरेंच्या अडचणीच्या काळात नीलम गोऱ्हे यांनी साथ सोडल्याने अनेकांनी भुवया उंचावलेल्या आहेत.
शिवसेनेच्या रणरागिनी नीलम गोऱ्हे या पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडायच्या. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. नीलम गोऱ्हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती. अखेर त्यांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला.