#

Advertisement

Thursday, July 6, 2023, July 06, 2023 WIB
Last Updated 2023-07-06T17:28:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चित्रा वाघ यांच्यासोबत काम करण्याचा प्रश्नच नाही !

Advertisement


कोल्हापूर: शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होतना अजित पवार यांच्या गटात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरही सामील झाल्या आहेत. रुपाली चाकणकर अजितदादांसोबत गेल्यानंतर तसंच सत्ताधारी पक्षात सामील झाल्यानंतर त्यांचा चित्रा वाघ यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'चित्रा वाघ यांच्यासोबत काम करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमच्या विचारधारेबरोबर काम करतो. समाज माध्यमांमध्ये व्हायरल होणारा फोटो 10 वर्षांपूर्वीचा आहे,' असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. 'तो फोटो व्हायरल करून एखाद्याचं घर चालत असेल तर नाईलाज आहे. नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमची विचारधारा घेऊनच काम करतो. त्यांच्या झेंड्याखाली काम करत नाही,' असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.