#

Advertisement

Tuesday, July 25, 2023, July 25, 2023 WIB
Last Updated 2023-07-25T18:03:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

श्रीगोंदा येथील महिला झाल्या आर्थिक सक्षम

Advertisement

श्रीगोंदा : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातील महिलांसाठी गृह उद्योग म्हणून बहुजन रयत परिषदेच्या वतीने शेतकरी, भूमिहिन शेतमजूर कुटूंबातील महिलांना उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी घरगुती डाळमिल उपलब्ध करून देण्यात आले. बहुजन रयत परिषदेच्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला संघटक मिनाक्षी सकट यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला.
गावातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता व्हावी त्या आत्मनिर्भर, निर्णयक्षम व्हाव्यात, यासाठी महिलांना एकत्र येण्याचे आवाहन बहुजन रयत परिषदेतर्फे मिनाक्षी सकट यांनी केले होते. त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आदी माहिती घेण्यात आली. या गृहउद्योगातून आता महिलांमध्ये विपणन कौशल्याचा विकास होणार आहे तसेच उत्पन्नाचे साधनही उपलब्ध झाले आहे. या उपक्रमाबाबत महिलांनी बहुजन रयत परिषदेचे तसेच मिनाक्षी सकट यांचे आभार व्यक्‍त केले.