#

Advertisement

Tuesday, August 1, 2023, August 01, 2023 WIB
Last Updated 2023-08-01T12:55:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपुर तालुक्‍यात 1000 पेक्षा अधिक फकीरा कांदबरीचे वाटप

Advertisement

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी राबविला स्तुत्य उपक्रम

पंढरपूर : महाराष्ट्रात आपल्या साहित्यातून परिवर्तन घडून आणणारे तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्वत्र समाधान व्यक्‍त करण्यात आले. लोकशाहीरांचे लिखाण, साहित्य सामान्यातील सामान्य नागरिक, कष्टकऱ्यापर्यंत पोहचावे यासाठी अण्णाभाऊ लिखीत फकीरा कांदबरीचे वाटप सर्वत्र करण्यात आले. पंढरपुर तालुक्‍यात किमान 1000 पेक्षा अधिक कांदबऱ्यांचे आज वाटप करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात इतरत्रही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकजागृतीचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. अण्णा भाऊ साठेंनी मोठे लिखाण केले. कथा, कविता, गीतं, लावण्या, कादंबऱ्या, वग, नाट्य, वृत्तांकन, लेख, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार त्यांनी हाताळले. पार्टीपत्रिका, युगांतरमधून स्तंभलेखनही करण्यात आलं. पुढे शाहीर विठ्ठल उमप यांनी या गाण्याला तरुण पिढी पुढे प्रसिद्ध करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. युापढील काळातही अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण वाचले जावे, अभ्यासले जावे या उद्देशाने त्यांनी लिहलेल्या कांदबऱ्या तसेच अन्य साहित्याच्या पुस्तकाचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.