Advertisement
नाशिक :
संघर्ष आणि जीवन जगण्याची धडपड वंचितांच्या संपुर्ण आयुष्यभर चालू आहे, परंतु हे
कष्ट आणि प्रेरणा या पृथ्वीला सुंदर बनवते. कष्ट करणाऱ्या श्रमिकांच्या हाताने
मानवी जीवन समृद्ध झाले असून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीने
जगभर श्रमिकांची क्रांती घडविले, असे प्रतिपादन भाजपा अनुसुचीत जाती मोर्चा नाशिक
शहर सचिव तथा बहुजन रयत परिषद नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे यांनी केले.
बहुजन रयत परिषद नाशिक शहर आणि सातपूर विभागाच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. यावेळी अंबादास आहिरे बोलत होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच स्थानिक नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात
कार्यरत असलेल्या कलावंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जयंती अध्यक्ष
विजय जगताप, ार्याध्यक्ष सोमनाथ केदार, कोषाध्यक्ष रवींद्र जगताप यांनी परिश्रम
घेतले. यावेळी सातपूर विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
