Advertisement
मोदींनी पुण्यातून मांडला देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा
पुणे : जगभर भारताच्या विकासाची चर्चा होतीये. त्याचा फायदा महाराष्ट्राला देखील होतोय. राज्याच्या विकासातून देशाचा विकास हाच आमचा मंत्र आहे. आज देशभरात एक लाखांच्या वर स्टार्टअप सुरू झाले आहेत. हाच तर विकास आहे. सत्ता येते आणि जाते समाज आणि देश तेथेच राहतो म्हणून आमचा प्रयत्न हा समाजाचे भविष्य उज्वल करण्यावर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशभरात सुरू असलेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली. पुण्यातीत पहिल्या मेट्रोच्या टप्प्याचं उद्घाटन मीच केलं होतं, आणि आताही मीच आलो आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पुणेकरांना 24 किलोमीटरची मेट्रो सेवा उपलब्ध झाली आहे. हे मेट्रो नेटवर्क आधुनिक शहरांची लाईफलाईन बनून गेलं आहे. आज जे प्रकल्प पुणे पीसीएमसीला मिळालेत त्यामुळे शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे. पुणेकरांचं जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सोबतच पुण्यातील प्रदूषण कमी करण्यावर देखील भर दिला जात असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
