#

Advertisement

Saturday, August 5, 2023, August 05, 2023 WIB
Last Updated 2023-08-05T11:35:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रात मिरवणुकीला रात्री 12 वाजपर्यंत परवानगी

Advertisement
  • मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून बहुजन रयत परिषदेची मागणी मान्य
  • माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी दिले होते निवदेन

सोलापूर : राज्यभरात दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 हा संपूर्ण महिना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे, यासंदर्भातील कार्यवाहीचे आदेश संबंधित जिल्हा पोलीस आयुक्‍तांना देण्यात आले आहेत. यासंदर्भातील मागणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने करण्यात आली होती, याची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतली आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत (ता. 28 जुलै) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे तसेच पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
माजी मंत्री ढोबळे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्यभरात दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 हा संपूर्ण महिना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. याबाबत बहुजन रयत परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन देण्यात आल्यानंतर याबाबत ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे पाठपुरावा करीत होत्या. यानुसार गृहमंत्रालयाने या मागणीचा सकारात्मक विचार करून मिरवणुकीसाठी रात्री 12 पर्यंत परवानगी दिली आहे. याबाबतच्या कार्यवाहीचे आदेश संबंधित जिल्हा पोलीस आयुक्‍तांना देण्यात आले आहेत.
याबद्दल बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे. यासंदर्भात समाजाच्यावतीने आभार पत्रही पाठविण्यात आले आहे.