#

Advertisement

Saturday, August 5, 2023, August 05, 2023 WIB
Last Updated 2023-08-05T11:36:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गृहमंत्र्यांचा आदेश सोलापूर पोलीस आयुक्‍त डावलणार?

Advertisement
अद्यादेश असूनही रात्री 12 पर्यंत मिरवणुकीस मान्यता देण्यास नकार
गृहमंत्र्यांच्या दालनात समाजातील युवक करणार ठिय्या आंदोलन

सोलापूर : राज्यभरात दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 हा संपूर्ण महिना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असून यासंदर्भातील कार्यवाहीचे आदेश मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी संबंधित जिल्हा पोलीस आयुक्‍तांना दिले आहेत. यासंदर्भातील अद्यादेशही काढण्यात आला आहे. याची प्रत दिल्यानंतरही सोलापूर जिल्हा पोलीस आयुक्‍तांनी मात्र मिरवणुकीसाठी रात्री 12 पर्यंत परवानगी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. परंतु, केवळ राजकीय हेतुने पोलीस आयुक्‍त मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा आदेश डावलत असल्याचा आरोप बहुजन रयत परिषदेकडून करण्यात आला आहे. पोलीस आयुक्‍तांच्या भूमिके विरोधात थेट गृहमंत्री फडणवीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा समाजातील युवकांकडून देण्यात आला आहे.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुकीस परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन समाजाच्यावतीने माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. राज्यभरातील समाजातील असंख्य तरूण त्यांच्यासोबत होते. राज्यभरातील समाजातील युवकांकडून अशी मागणी होत असल्याने याची तातडीने दखल घेत गृहमंत्री फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी दिली आहे, याचा अद्यादेशही काढला आहे. तसेच याची अंमलबजावणीचे आदेशही दिले आहेत. परंतु, सोलापुरचे पोलीस आयुक्तांनी मात्र परवानगी देण्यास असमर्थता दाखविली आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्‍त हे कॉंग्रेसी विचारांचे तसेच त्या पक्षाच्या नेत्यांच्या जवळचे असल्याने याबाबतचे श्रेय बहुजन रयत परिषद तथा भाजपला मिळू नये यासाठीच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा आदेश डावलून पोलीस आयुक्‍तांकडून समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप बहुजन रयत परिषदेतील समाजातील युवकांकडून केला जात आहे.