#

Advertisement

Wednesday, August 23, 2023, August 23, 2023 WIB
Last Updated 2023-08-23T17:23:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"चांद्रयान 3'च्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार

Advertisement


ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्‍त केली प्रतिक्रिया

दिल्ली : "चांद्रयान-3'च्या यशस्वी लॅडिंगनंतर संपूर्ण देशात, शहरात आनंदाचे वातावरण आहे. राजधानी दिल्ली येथेही नागरिकांनी या ऐतिहासिक यशाचा जल्लोष केला. "चांद्रयान 3'च्या यशस्वी मोहिमेचा आनंद संपूर्ण देशाने अनुभवला. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार ठरलो आहोत, याचा खूप आनंद आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅन्डिंग करणारे आपण पहिले आहोत. या मिशनमुळे नवी माहिती आपण रीसर्चद्वारे जगासमोर ठेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
"चांद्रयान 3'ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लॅन्डिंग करून इतिहास रचला आहे. एक भारतीय म्हणून या घटनेचा अभिमान वाटतो. या मिशनसाठी गेल्या अनेक वर्षांपासून इस्रोची टीम काम करीत होती. चंद्रयान 2' मिशनपेक्षा हे मिशन खूपच वेगळे होते. चांद्रयान-3'ने चांद्रभूमीला यशस्वी स्पर्श केला. तमाम भारतीयांचे स्वप्न साकार झाले आहे. नासा, युरोपियन स्पेस एजन्सीच्या नजरा भारताच्या चांद्रयान 3'कडे होत्या. त्यामुळे जागतिकदृष्ट्याही या मोहीमेचे महत्त्व वाढले होते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सेफ लॅन्डिंग करणाऱ्या यादीत आता आपल्या देशाचाही आता उल्लेख होणार, याचा मला अभिमान आहे. "चांद्रयान 3' ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या इस्रोच्या टीमचे अभिनंदन.