#

Advertisement

Thursday, August 31, 2023, August 31, 2023 WIB
Last Updated 2023-08-31T12:45:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

50 हजार राख्या आणि एकाच "ताई'ची चर्चा

Advertisement

 



शाहू शिक्षण संस्था आणि बहुजन रयत परिषदेचे आयोजन

सोलापूर : जिल्ह्यात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळचे रक्षाबंधनावेळी मात्र जिल्ह्यासह मंगळवेढा, पंढरपूर आदी भागात एकाच "ताई'ची चर्चा होती. ती म्हणजे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या तसेच आगामी लोकसभा किंवा विधानसभा उमेदवारीच्या भक्कम दावेदार मानल्या जात असलेल्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची. "माझ्या बहुजनांसाठी एक राखी रक्षणाची विश्वासाची सामाजिक एकतेची' या उपक्रमांतर्गत 50 हजार पेक्षा अधिक राख्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी तयार करण्यात आलेल्या राखींच्या पाकिटावर "ताई' म्हणून ऍड. कोमलताई यांचे छायचित्र होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींच्या हातात आणि विद्यार्थ्याच्या हातावर ऍड. कोमलताई यांनी दिलेली राखी दिसत होती. हेच राखी बांधणारे आणि बांधलेले हात एकजुट होतील, अशी भावना यावेळी आयोजकांकडून व्यक्‍त करण्यात आली.
शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे तसेच बहुजन रयत परिषदच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी "माझ्या बहुजनांसाठी एक राखी रक्षणाची विश्वासाची सामाजिक एकतेची' हा उपक्रम राबविला होता. प्राथमिक, माध्यमिक, आश्रम शाळा, वसतीगृह तसेच महाविद्यालयांत या राख्यांचे वाटप करण्यात आले. शाहू शिक्षण संस्थेतील शिक्षक, कर्मचारी वर्ग तसेच बहुजन रयत परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांनी या राखींची वाटप केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्षाबंधनाचा सण "ताईं'च्या बरोबरीने अशा पद्धतीने उत्साहात साजरा केला.