#

Advertisement

Thursday, August 31, 2023, August 31, 2023 WIB
Last Updated 2023-08-31T17:47:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

इगतपुरीतील वाचनालयात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारावा

Advertisement

इगतपुरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालयात अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी इगतपुरी बहुजन रयत परिषदेतर्फे करण्यात आले असून याबाबतचे निवेदन सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी ठाकरे यांना देण्यात आले. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
यावेळी बहुजन रयत परिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, शहर अध्यक्ष संदिप आवळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण भाऊ फलटणकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, शिवसेना ठाकरे गट माजी नगरसेवक सतिश सकट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते अमोल भाऊ खातळे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते नागेश तुपे, सुनिल अवघडे, दिपक भोंडवे, अजय तुपे, गणेश अवघडे, विजय गायकवाड, राम अवघडे, नंदकुमार भोंडवे, राजू अवघडे, श्री गायकवाड, प्रमोद भोंडवे, गणेश भोंडवे, अप्पा भोंडवे, बाबु भोंडवे, स्वप्नील भोंडवे, अक्षय भोर आदी उपस्थित होते.