#

Advertisement

Monday, August 7, 2023, August 07, 2023 WIB
Last Updated 2023-08-07T11:07:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

वंचित आघाडी महापालिकेत 88 जागा लढवणार

Advertisement

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत 88 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेत 88 जागा लढवणार आहोत. त्यामुळे बदलाचं राजकारण सुरू होणार आहे, असं सांगतानाच मुस्लिम समाजात आता नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. मुस्लिम मतदारसंघात महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत बदल झाला पाहिजे. , असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात बोलत होते. खूप वर्षापासून मी मुस्लिमांचं राजकारण पाहत आलो आहे. मुस्लिमांच्या राजकारणात गढे मुर्दे उखडले जात आहेत. यांना दंगली हव्या आहेत काय? अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी अबू आझमी यांचं नाव न घेता टीका केली. आम्ही ज्यांना गाडलं त्यांना विधानसभेत पुन्हा जिवंत केलं जातं आहे. ही कोणती राजनीती आहे? यांना काय हवं आहे? परिस्थिती अजून खराब होणार आहे. दंगली होतील आणि हे घडवून आणण्याच काम होणार आहे. कारण काही लोकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.