Advertisement
मुंबई : अजित पवार आल्यानंतर शरद पवारही आपल्यासोबत येतील असं भाजपला वाटत होतं. पण शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता भाजपने पुढचा डाव टाकला आहे. भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून या दोन ऑफर्स देण्यात आल्या आहेत. भाजपच्या या खेळीमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे. तसं वृत्तच फ्रि प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
