#

Advertisement

Wednesday, August 16, 2023, August 16, 2023 WIB
Last Updated 2023-08-16T14:52:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गार्डी गावाशी माझे अतूट नाते

Advertisement

 

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे भावनात्मक प्रतिपादन 

पंढरपूर : माझे आराध्य माजी मंत्री व शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य जेथून सुरु झाले ती पुण्यभूमी म्हणजे पंढरपूर. साहेबांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने, परखड विचाराने आणि लोकहिताच्या कार्याने अनेक माणसं जोडली. या तालुक्यातील प्रत्येक गावाशी सरांचा स्नेहबंध जुळला आहे, तो आजही अतुट आणि कायम आहे. या तालुक्यातील गार्डी हे असंच एक गाव असल्याचे भावनात्मक प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे -ढोबळे यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाजबांधवांच्या अडचणी जाणून घेताना ॲड. कोमलताई यांनी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

त्या म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या गावात येणे झाले आणि सर आले आहेत हे समजल्यावर जुन्या फळीतील सहकारी भेटल्याचा आनंद झाला. समाजबांधवांची आज झालेली गर्दी हिच माझी ऊर्जा आहे.  खरंतर माणसंच माणसाला पुढं जायला बळ देतात. म्हणून माणसं जोडणं आणि त्या माणसांच्या भल्यासाठी झगडणे यात जे समाधान आहे, त्याला मोल नाही.

या कार्यक्रमास माजी मंत्री आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब,आमदार शहाजी बापू पाटील यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील,पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के,महात्मा फुले सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन शरद आडगळे लखन चौगुले, गार्डी गावचे सरपंच शिवकुमार फाटे,डेप्युटी सरपंच शिवाजी आडगळे,सावकार ग्रुपचे रविकांत आडगळे,भोसे गावचे नेताजी वाघमारे,संजय लोखंडे,अंबादास वायदंडे, सुनील आडगळे आटपाडीचे संतोष लांडगे अमोल लांडगे, रवी लांडगे यांच्यासह सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होता.


अशी माणसं भेटली की बळ मिळते!

साहेबांचे जुने सहकारी आणि महात्मा फुले सूतगिरणीचे व्हा. चेअरमन शरद गायकवाड यांनी त्यांच्या घरी स्नेह भोजनाचे आयोजन केले. घरी गेल्यानंतर घरातल्या महिलांनी माझे औक्षण केले. आशीर्वाद दिले आणि तेवढ्याच अगत्यानं, प्रेमानं आमचा पाहुणचारही केला. हे सगळं वातावरणच चैतन्यदायी होतं. अशी माणसं भेटली की लढायला अजून बळ मिळतं.