#

Advertisement

Thursday, August 10, 2023, August 10, 2023 WIB
Last Updated 2023-08-10T12:34:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विभागीय साहित्य संमेलन "लोगो'चे अनावरण

Advertisement

माजी मंत्री ढोबळे, जिल्हाधिकारी आर्शिवाद यांची उपस्थिती

सोलापूर :सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन मंगळवेढा येथे होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. या संमेलनाच्या "लोगो'चे अनावरण सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते तसेच या साहित्य परिषदेचे स्वागताध्यक्षपदी "शब्दप्रभू' माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते विशेष उपस्थितीत करण्यात आले. यावेळी समन्वयक पद्माकर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशिर्वाद यांचा सत्कार माजी मंत्री ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला. मसाप पुणेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांनी सदर विभागीय साहित्य संमेलनाबाबतची माहिती दिली.
यावेळी मसाप दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, कार्याध्यक्ष दिगंबर भगरेख कार्यवाह लहू ढगे, नगरविकास विभागाचे प्रशासनाधिकारी आशिष लोकरे, मंगळवेढयाचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, सुरसंगम फॅमिली ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण नागणे, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दावल इनामदार, जिल्हाध्यक्ष समाधान वाघमारे, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनाही साहित्य संमेलनाच्या शिष्टमंडळाने भेटून निमंत्रण दिले.
संत चोखामेळा, संत दामाजी आणि कान्होपात्रा यांची साहित्य परंपरा लाभलेल्या मंगळवेढ्यात संत दामाजी नगरीत हे विभागीय साहित्य संमेलन होत असल्याने शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.