Advertisement
दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता संसदेत अविश्वास प्रस्ताव आणि मणिपूरवरील विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. अविश्वास प्रस्ताव हा आमच्याविरोधात नाही तर ही विरोधकांचीच कसोटी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
