Advertisement
नवी दिल्ली : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले. माझे या दोघांशीही चांगले सबंध आहेत. त्या विषयावर दोघे बोलत असताना बाकी कुणी बोलायची गरज नाही, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
NDA च्या महाराष्ट्रातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. त्यावर राऊतांनी भाष्य केलं.
घेऊ द्या बैठका… बैठका घेतल्याने काही होत नाही. मूळ NDA आहे तरी कुठं? जे जुने सहकारी पक्ष होते ते आता त्यांच्यासोबत आहेत का ? आम्ही INDIA स्थापन केल्यावर तुम्हाला NDA ची आठवण आली. NDA चा सगळ्यात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार, असा विश्वास राऊत यांनी बोलून दाखवला.
