#

Advertisement

Tuesday, August 8, 2023, August 08, 2023 WIB
Last Updated 2023-08-08T19:33:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उमरगा व लोहारा तालुक्यात वाढली बहुजन रयत परिषदेची ताकद

Advertisement

 

कार्यकारणी जाहीर : अध्यक्षपदी धोंडीराम मोहिते, महिला तालुकाध्यक्ष पदी मीनाक्षी सोपान गायकवाड

उमरगा : बहुजन रयत परिषद उमरगा व लोहार तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याने अन्य पक्षांच्या तुलनेत राजकीय ताकद वाढली आहे.

बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे व महिला प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंखे-ढोबळे व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

बहुजन रयत परिषद उमरगा व लोहार तालुका अध्यक्षपदी धोंडीराम मोहिते, कार्याध्यक्षपदी निजाम सेडमवाले, उमरगा शहर अध्यक्षपदी वामन शिंदे, उमरगा व लोहारा महिला तालुकाध्यक्ष पदी मीनाक्षी सोपान गायकवाड, तालुका संघटक पदी हनुमंत मुळे यांची निवड करण्यात आली. 

सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे नवनिर्वाचितांचा सत्कार माजी मंत्री लक्षमणराव ढोबळे कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.