Advertisement
नाशिक : ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर धमकीचा फोन आला आहे. भुजबळांकडून नाशिक पोलीस आयुक्तांकडे आलेल्या फोन संदर्भात माहिती देण्यात आली. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
