#

Advertisement

Tuesday, August 22, 2023, August 22, 2023 WIB
Last Updated 2023-08-22T11:59:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमच्या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही !

Advertisement

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं अन् शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडला. हा मंत्रिमंडळ विस्तारात झाल्यास आपल्याला संधी मिळेल, असा आशावाद भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना होता. मात्र, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अशात रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही मंत्रिपदावर दावा केला. आमच्या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही, अस रामदास आठवले म्हणाले.
आमची मागणी आहे की, आम्हालाही मंत्रिपद द्यावं. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद द्यावं म्हणून सांगितलं. मात्र अजित पवार यांचा विस्तार होईल समावेश होईल. हे आम्हाला ही माहिती नव्हतं. पण तरिही आमची मागणी कायम आहे. आरपीआयला मंत्रिपद मिळावं.
आगामी लोकसभा निवडणुक संदर्भात आजचा मेळावा आहे. महायुती सोबत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळणार आहेत. ज्यावेळी निवडणूक होतील तेव्हा आरपीआयच्या नेत्यांना जनता निवडून देईल, असं आठवले म्हणाले