#

Advertisement

Friday, August 11, 2023, August 11, 2023 WIB
Last Updated 2023-08-11T11:12:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बहुजन रयत परिषदेकडून बापूसाहेब गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी

Advertisement

पश्‍चिम महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी निवड

श्रीगोंदा : नगर जिल्ह्यात बहुजन रयत परिषदेचा वेगाने विस्तार होत असताना श्रीगोंदा तालुक्‍यातील चांगदरी येथील बहुजन समाजातील दुर्लक्षित प्रश्नाविषयी आवाज उठवणारे बापूसाहेब गायकवाड यांची बहुजन रयत परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परिषदेच्या ध्येयधोरणानुसार आजपर्यंत केलेले आपण काम सामाजिक निष्ठा व सामाजिक संघटनेसाठी घेतलेले कष्ट विचारात घेत गायकवाड यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळ व महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे- ढोबळे यांनी सांगितले.
सोलापूर येथील कार्यक्रमात गायकवाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. राज्यातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे जतन करून समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे दृष्टीने राज्य पातळीवर बहुजन रयत परिषदेची स्थापना करण्यात आली. शिक्षण, व्यवसाय, कायदा, चळवळ, संघटन चातुर्य यासंबंधीचे विचारात घेऊन आपली नेमणूक करण्यात आली आहे, हे लक्षात घ्यावे, आपल्या आजपर्यंतच्या कामाबद्दल कौतुक केले आहे. संघटनेच्या पातळीवर आपण सर्वजण सारखे व समान असून भविष्यात समाज प्रबोधनासाठी व समाज कल्यानासाठी एकमताने चळवळ उभारू, असे आवाहन बहुजन रयत परिषद माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष ऍड.कोमलताई साळुंखे-ढोबळे, कार्याध्यक्ष ऍड. शुभा पिल्ले, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, ना. म. साठे, वसंतराव सकट, पत्रकार अंकुश शिंदे, सरपंच मीनाताई सकट, विनायक ससाणे, गुलाबराव तोरडमल यांनी गायकवाड यांचे अभिनंदन केले.