Advertisement
पुणे : पुणे शहरात विमानतळ निर्मिती करण्याची घोषणा अनेकवेळा झाली. परंतु त्यासाठी ठोस निर्णय झाला नाही. आता पुण्यातील पुरंदर विमानतळ निर्मितीसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्य सरकारकडून पुरंदरमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा आठ वर्षांपूर्वी होती. त्यासाठी सात गावांमधील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जागा संपादीत करण्यात येणार होती. त्यासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार, आणि भारतीय विमान प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला. परंतु भूसंपादन झाले नाही. आता विमानतळाच्या भूसंपादनासाठी 5,000 कोटी लागणार आहे. परंतु राज्य सरकार हा पैसा उभारु शकत नाही. यामुळे अदानी उद्योग सूमह हा निधी देणास तयार आहे.
अदानी समूहासोबत पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम एमआयडीसी किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट कंपनीकडून होणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या दोन महिन्यात होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
