#

Advertisement

Saturday, August 26, 2023, August 26, 2023 WIB
Last Updated 2023-08-26T12:19:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंतप्रधानांच्या ISRO भेटीवरुन राजकारण

Advertisement

स्वागताला कर्नाटकचे मुख्यमंत्री का नव्हते?

बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी बंगळुरुमध्ये दाखल झाले. चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगबद्दल त्यांनी इस्रोच्या मुख्यालयात जाऊन वैज्ञानिकांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार मोदींच्या  स्वागताला विमानतळावर उपस्थित नव्हते. याच मुद्यावरुन आता राजकारण सुरु झाल आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुद्दामून त्यांच्या स्वागताला येण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखलं, असा दावा काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचा सन्मान केला. म्हणून मोदी वैतागले होते. त्यामुळे मोदींनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांना स्वागतला येण्यापासून रोखलं. हे शिष्टाचाराच्या विरोधात आहे. यात फार काही नाहीय. हे क्षुद्र राजकारण आहे” असं वरिष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितल...
बंगळुरुमध्ये कधी पोहोचणार हे आपल्यालाच माहित नव्हतं. म्हणून इतक्या सकाळी मंत्र्यांना त्रास द्यायचा नव्हता असं पंतप्रधान मोदींकडून सांगण्यात आलं. बंगळुरुमध्ये कधी पोहोचणार हे माहित नव्हतं, त्यामुळे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना इतक्या सकाळी माझ्या स्वागताला येऊ नका अशी विनंती केली होती. बंगळुरुच्या HAL विमानतळाबाहेर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.