Advertisement
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी प्रमुख पक्ष एकवटले आहेत. दिल्ली त्यानंतर बंगळूर येथे विरोधी पक्षाच्या बैठका झाल्या. दिल्ली येथे सुरवातीला कमी असलेल्या पक्षांची संख्या वाढून ती जवळपास २६ इतकी झाली आहे. बंगळूर येथे झालेल्या बैठकीमध्ये या आघाडीला INDIA असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी INDIA हे नाव सुचवले होते. त्याला सर्वच पक्षांनी बहुमताने मंजुरी दिली. आता मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे. 26 पक्षांचे समर्थन असलेल्या INDIA आघाडीची तिसरी आणि महत्वाची बैठक मुंबईमध्ये होत आहे. बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. याच बैठकीमध्ये INDIA आघाडीचे संयोजक कोण असणार? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर मुंबईच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीमध्ये INDIA आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. भारतीय झेंड्यामध्ये ज्याप्रमाणे तीन रंग आहेत. तशाच प्रकारचा हा लोगो असणार आहे. मात्र, या लोगोमध्ये चार रंग असतील. त्या रंगांच्या माध्यमातून देशातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न INDIA आघाडी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
