#

Advertisement

Saturday, August 26, 2023, August 26, 2023 WIB
Last Updated 2023-08-26T12:30:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे !

Advertisement

कोल्हापूर : आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे!, असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, ही वस्तूस्थिती आहे. पण या लोकांना राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारला असता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पण हे लोक म्हणजे पक्ष नव्हे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर भाष्य केलं आहे. 
आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात जाऊन आमचे म्हणणे मांडत आहोत. महाविकास आघाडी अर्थात ‘INDIA’ ची बैठक 1 तारखेला मुंबईला होणार आहे. राजकीय 16 पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत एकत्रित प्रचार मोहीम आणि लोकसभा निवडणुकीत एकत्रित राहण्याचा आढाव घेण्यात येणार आहे, असं म्हणत शरद पवार यांनी ‘INDIA’च्या बैठकीची माहिती दिली.