#

Advertisement

Saturday, August 26, 2023, August 26, 2023 WIB
Last Updated 2023-08-26T12:36:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दलित तरूणाला झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण

Advertisement

अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

अहमदनगर : माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण झालेला तरुण अल्वयीन आहे. अत्यंत किरकोळ कारणावरु त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. शेळी चोरल्याच्या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेय. त्याच्यासह  इतर काही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव इथं हा अमानुष प्रकार घडला आहे. 
मारहाण करणा-यांनी तरूणाला झाडाला उलटं लटकावलं आणि माणुसकीला लाजवणारं कृत्य केलं. पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणेल असाच हा प्रकार आहे. या घटनेनंतर नगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळलीय. रिपाइनं आक्रमक पवित्रा घेत या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केलीय. तसच आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.