#

Advertisement

Saturday, September 2, 2023, September 02, 2023 WIB
Last Updated 2023-09-02T12:34:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मध्यरात्री गाडी पडली बंद.., ऍड. कोमलताईंनी दिली सचूना...

Advertisement

- पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड-पाटस येथे गाडीचा फुटला डिझेल पाईप
- रात्रीची वेळ आहे स्थानिक कार्यकर्त्यांना घटनास्थळी बोलावू नका

लक्षवेधी प्रतिनिधी
पाटस : महाराष्ट्र राज्यात बहुूजन रयत परिषदेला राजकीय पक्षाचा दर्जा जनमाणसांतूनच मिळाला आहे. गाव तेथे शाखा आणि वाडीवस्तीवर कार्यकर्ता आहे. राजकीय पक्षाप्रमाणेच पदाधिकाऱ्यांची रचना असलेल्या परिषदेच्या कामाची दखल मंत्रालयातही घेतली जाते. बहुजन कार्यकर्त्यांची मोठी फौज, ही परिषदेची मोठी ताकद मानली जाते. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या नेतृत्त्व कौशल्यातून परिषदेवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनीही कार्यकर्त्यांना जपणारे नेतृत्व म्हणून परिषदेत आपली स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. याचा अनुभव कार्यकर्त्यांना अनेक वेळा आला आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आल्याचे दौड-पाटस (पुणे जिल्हा) येथील कार्यकर्त्यांनी "लक्षवेधी'शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात यावर्षी बहुजन रयत परिषदेने केलेल्या आवाहनानुसार पूर्ण ऑगस्ट महिना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाज बांधवांच्या आग्रहास्तव बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी राज्यभरातील प्रत्येक कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यातून समाज बांधवांची प्रचंड एकजुट दिसून आली तरी बहुजन रयत परिषदेचे जाळे राज्यभरात घट्ट विणल्याचेही अधोरेखित झाले.
या दौऱ्यात ऍड. कोमलताई यांची मोठी धावपळ झाली. गाडी महिनाभर सतत धावत होती. कधी महामार्ग तर कधी गावरस्ते, वाड्यांवस्तींवरील रस्त्यांची धुळ गाडीने उडविली. 
महाराष्ट्र दौऱ्याचा अखेरचा कार्यक्रम झाल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर गुरूवारी, ता. 31 मध्यरात्री 2:30च्या सुमारास ऍड. कोमलताई यांच्या गाडीचा डिझेल पाईप फुटला, सर्व रस्त्याने डिझेल सांडत असल्याचे अन्य वाहनचालकांनी निदर्शनास आणून देईपर्यंत इंजिनमधून धूर निघू लागल्याने चालकाने गाडी तातडीने बाजुला घेतली, त्यावेळी गाडी पेट घेण्याचा धोका लक्षात घेत त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे स्वीय सहायक विशाल खंदारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत ऍड. कोमलताई यांना गाडीतून तातडीने घाली उतरवत तेथेच सुरक्षितस्थळी थांबण्यास सांगितले. गाडीमध्ये बहुजन रयत परिषदेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, लॅपटॉप आदी वस्तू असल्याने त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या. बोनेट उघडून चालकाने इंजिन थंड करण्याचा प्रयत्न केला, मोठी दुर्घटना टळली असली तरी मध्यरात्रीची वेळ असल्याने दौंड-पाटस येथील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना याबाबत कुठलीही कल्पना देऊ नका, त्यांना घटनास्थळी बोलावू नका, अशी स्पष्ट सूचना ऍड. कोमलताई यांनी स्वीय सहायक विशाल खंदारे यांना केली. तर, बाबत अजय साळुंखे यांना कळविण्यात आल्यानंतर ते पुण्याहून दुसऱ्या वाहनाने घटनास्थळी तातडीने आले. पत्नी ऍड. कोमलताई यांना घरी घेऊन निघताना. गाडी येथे ठेवू नका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लगेच समजेल, अशी सूचना करीत त्याचवेळी क्रेन बालावून नादुरूस्त गाडी मध्यरात्रीच तातडीने पुणे येथे नेण्यात आली. या सगळ्या घटनाक्रमात पहाट झाली. ऍड. कोमलताई सुरक्षितपणे घरी पोहचल्या. परंतु, याची खबरबात सकाळपर्यंत दौड-पाटस येथील बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांना नव्हती. टोलनाक्‍यावरील काही कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या घटनेची माहिती समजल्यानंतर याबाबत त्यांनी थेट ऍड. कोमलताई यांच्याकडे फोनद्वारे नाराजी व्यक्‍त केली. परंतु, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नेत्याची काळजी घ्यायची नाही तर कार्यकर्त्यांची काळजी नेत्याने घ्यायची असते, अशा मोजक्‍या शब्दांत त्यांनी दौंडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची समजूत काढली. या घटनेविषयी माहिती मिळेल, तसे ऍड. कोमलताई यांना राज्यभरातून फोन सुरूच होते. अखेर आपण, सुरक्षित असल्याचे त्यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना कळविले.