#

Advertisement

Tuesday, August 22, 2023, August 22, 2023 WIB
Last Updated 2023-08-22T12:09:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गुवाहाटीला जाण्यापूर्वी शिंदे सोबत काय ठरले !

Advertisement


पुणे : शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर नेमके काय ठरले होते? या गोष्टींच्या चर्चा अधुनमधून होत असतात. त्यावर आता आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले, अशी माहिती बच्चू कडू यांनी भर कार्यक्रमात दिली. त्यांच्या सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झाल्याचं कडू यांनी जाहीरपणे सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बच्चू कडू यांनी सांगितले की, मी शिंदे साहेबांसोबत येण्यासाठी अट घातली. ही अट म्हणजे दिव्यांग मंत्रालय होत असेल तर मी तुमच्यासोबत येतो, अशी होती. देवेंद्र फडणवीस यांना हे मी स्पष्टपणे सांगितले आणि त्यांनी त्याला होकार दिला. आता अनेक जण मंत्री पद मागत होते. मला मंत्रालयच भेटले आता मंत्रिपदाचं काय काम आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते मंत्रीपदावरून नाराज नसल्याचं स्पष्ट झाला आहे.