Advertisement
मुंबई | आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना भोजनाचं आमंत्रण दिलं आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे भोजन देण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगली आहे. डिनरच्या माध्यमातून आमदारांशी संवाद साधण्याचा शिंदे यांचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. ताज लँडझेंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना डिनर ठेवलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी ही डिनर डिप्लोमसी होणार आहे. शिंदे यांच्या या डिनरला भाजप आणि अजितदादा गटाचे आमदारही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आमदारांशी संवाद साधणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि त्यांच्या समस्या ऐकून घेऊन मार्गी लावणं हा त्यामागचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे.
