Advertisement
पुणे : अजित पवार यांच्यासोबत गुप्त बैठक मी तरी घेतलेली नाही. मला भावाला भेटायला सिक्रेट मिटींग करायची गरज नाही. आम्ही पारदर्शकपणे जगतो. या लोकशाहीत लपवायचं तरी काय?”, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाली होती. या गुप्त बैठकीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आम्ही कायदेशीर कारवाईसाठी प्रकियेने जाणारे लोकं आहोत. त्यामुळे आम्ही योग्य प्रकियेने जातोय”, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांच्यासाठी परतीचे दरवाजे खुले आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट नाही. आमच्या पक्षाच्या 9 आमदार आणि 2 खासदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांना जी काही नोटीस पाठवायची ती पाठवलेली आहे. आम्ही त्यांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहतोय”, असं सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
