Advertisement
नवी दिल्ली : शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावणी सोमवारी पार पडणार आहेत. शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होणार असताना आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबतच्या सर्व चर्चा थांबल्या होत्या. पण आता पुन्हा याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.