Advertisement
पुणे : वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होतील. या बैठकांचं आता नियोजन होणार आहे. काही सभा एकत्रित वज्रमूठ सभा होतील. तर काही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार यांच्या वेगळ्या सभा होतील”, अशी महत्त्वाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली.
मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, जयंत पाटील या चारही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती पाटील यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीत वज्रमूठ सभांबद्दल चर्चा झाली. वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होतील. या बैठकांचं आता नियोजन होणार आहे. काही सभा एकत्रित वज्रमूठ सभा होतील. तर काही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार यांच्या वेगळ्या सभा होतील.
ठाण्याला आमच्या वज्रमूठची सभा होणार आहे, असा अंदाज आहे. तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन सभा ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्थानिक नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे वज्रमूठ सभा बंद झाल्या होत्या.