Advertisement
- पुण्यात संघटनेची राज्यस्तरीय समन्वय बैठक उत्साहत
- प्रदेशाध्यक्षपदी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची सर्वानुमते निवड
- प्रथमच युवती शाखा सुरू करण्याची घोषणा
- विविध प्रश्नी शिष्टमंडळ राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना भेटणार
या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेची फळी मजबूत करणारी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित होतीच याशिवाय सळसळत्या रक्ताची ध्येयवेडी तरुणपिढी, महिला आणि ट्रान्सजेन्डर यांची देखील उपस्थिती "लक्षवेधी' होती.
या बैठकीत राज्य कार्यकारिणीने ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची सर्वानुमते बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्याची मागणी संस्थापक प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडे करण्यात आली, त्यांच्याकडे यापूर्वी महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद होते. संघटनेने आता त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. तसेच, यावेळी काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीदेखील करण्यात आल्या. यावेळी सर्वांनी शपथ घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प पदाधिकारी ब कार्यकर्त्यांनी केला.
या बैठकीत संघटनेची ध्येयधोरणे आणि पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासाठी व उपेक्षित बहुजन समाजाचे विविध ज्वलंत प्रश्न आणि समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना भेटणार आहे.
बैठकीस माजी मंत्री व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, महिला आघाडी कार्याध्यक्ष ऍड. शुभा पिल्ले, कार्यकारिणी सदस्य रवींद्र वाकळे, नारायण साठे, दत्तात्रय पाटील, साहेबराव शृंगार, अंबादास आहिरे, बापूसाहेब गायकवाड, मीनाक्षी सकट तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
