Advertisement
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे
(साहेब) यांची निवड झाल्याबद्दल "महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी
संघटने'च्या वतीने ढोबळे यांचा आकाशवाणी आमदार निवास (मुंबई) येथे सत्कार करण्यात
आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह संघटनेचे अध्यक्ष मारुती कांबळे, कोषाध्यक्ष दत्तात्रय पाटील, संघटनेचे माजी अध्यक्ष एकनाथ कांबळे, पश्चिम महाराष्ट्रचे विभागप्रमुख शाम मोरेसर, जिल्हा अध्यक्ष अमोल हुंगे, अमर बाबर, विशाल चौगुले, सुशील मेंडगुदली, महादेव वाघमारे, उत्तम गवळी, अतुल उकळे, सोमनाथ खोकले यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. | |||