Advertisement
महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक
मुंबई : महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे ठरले आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय आज घेण्यात आला.
याबाबत माहिती देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, आज तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक झाली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आज ही बैठक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बंगल्यावर झाली. विशेष रूपाने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा पूर्ण विचार करताना राज्यांमध्ये ४८ लोकसभा क्षेत्रांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून ४५ च्या वर जागा निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत जे ठरले होते. ते

विषय पुढे नेण्यासाठी, निर्णय करणे अपेक्षित होते, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी समन्वय समितीबरोबर अन्य नेत्यांवर असेलच, पण त्याबरोबर प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये समन्वय करण्यासाठी या तिन्ही पक्षांबरोबर एनडीएतील अन्य घटक पक्ष या सगळ्यांबरोबरची एक समन्वय समिती सर्वसमावेशक सर्वव्यापी या पद्धतीने लोकसभा क्षेत्रात करण्याचा आज निर्णय झाला. त्यासाठी नावाचा विचार झाला. अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते करतील, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.
बरोबरीने २८८ विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही घटक पक्षांबरोबर निवडणुकांचा विचार करत आहोत. त्यामध्ये सुद्धा एक विधानसभा क्षेत्र, एक सर्वव्यापी टीम अशी कोअर ग्रुप प्रत्येक विधानसभानुसार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असून महायुतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याबाबतीतील चर्चा पूर्ण झाली. विधिमंडळामध्ये सुद्धा ज्या विविध समित्या असतात आणि या सर्व विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या समित्यांच्या बाबतीत सुद्धा त्याबद्दल आवश्यक नावे आवश्यक कोटा आणि आवश्यक विभागणी याच्यावर एकमत झाले. तोही निर्णय काही दिवसात घोषित होईल. एकंदरीत नियमितपणे एकत्रित निर्णय करण्याच्या प्रक्रियेला चांगली गती या बैठकीनंतर मिळाली. तिन्ही पक्षांची महायुतीतील अन्य घटक पक्षांबरोबर चर्चेला गती मिळाली याचाही आम्हाला आनंद आहे, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पहिले तर ते इंडिया नसून घमंडिअलाईन्स आहे. ते काय करतात त्यांचा त्यांना लखलाभ असो. आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आपापसातील संवाद हा दुसऱ्याने घडवून आणण्याची आवश्यकता नसल्यामुळे तो सहज आणि चांगला आहे. त्यांच्या स्तरावर याचा निर्णय होईल आणि झालाही आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, याचा अधिकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा आहे. त्यांच्या तिघातील हा विषय आहे. त्यामुळे ते तिघे देतील असेही ते म्हणाले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे - पाटील, दादा भुसे, धनंजय मुंडे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड आशिष शेलार,आ. प्रसाद लाड आणि आशिष कुलकर्णी आदी या बैठकीला उपस्थित होते.