#

Advertisement

Wednesday, September 13, 2023, September 13, 2023 WIB
Last Updated 2023-09-13T10:47:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रक्षा खडसे, पक्षासाठी सासऱ्यांच्या विरोधात लढणार

Advertisement

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे. देशभरात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण रावेर लोकसभेची जागा निवडू, असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या जागेवर सध्या एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या खासदार आहेत.
रक्षा खडसे या सध्या भाजपात आहेत. तर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात रावेरमध्ये दोघांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर राजकीय रणांगणात सख्खे सासरे आणि सून आमनेसामने येऊ शकतात. दुसरीकडे रक्षा खडसे या रावेर लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच आपण या निवडणुकीत पुन्हा एकदा जिंकूनच येऊ, असा दावा त्यांनी केला आहे. 

रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या? 
आपण आपले सासरे एकनाथ खडसे यांच्यासमोर निवडणूक लढणार. निवडणुकीत कुठेही कमी पडणार नाही, असं म्हणत रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “इंडिया आघाडीने एकनाथ खडसेंना संधी दिली आणि पक्षाने मला संधी दिली तर त्या परिस्थितीला मी सामोरं जाणार”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.