Advertisement
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे : देशात "जी 20" परिषद यशस्वी आयोजनाचा अभिमान
पुणे : गेली वर्षभर अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली "जी20' शिखर परिषद गेल्या आठवड्यात दिल्ली येथे शाही थाटात पार पडली. या शिखर परिषदेसाठी विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांनी उपस्थिती लावली, यानिमित्ताने दिल्लीत जग अवतरल्याचा अनुभव देशवासियांनी घेतला. यामध्ये चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युटोपियन युनियन आणि अर्जेंटिना हे देश सहभागी झाले होते. भारताने पहिल्यांदाच एकाच वेळी इतक्या आंतरराष्ट्रीय नेत्यांचे यजमानपद स्विकारत भारतीय संगित आणि खाद्य संस्कृतीद्वारे त्यांचे आदरातिथ्य केले. या परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते यशस्वी करून दाखविले.2022 मध्ये पहिल्यांदाच "जी 20'चे अध्यक्षपद भारताला मिळाले. त्यानंतर गेल्या वर्षभरात देशातील कानाकोपऱ्यात "जी 20' परिषदा घेण्यात आल्या. या बैठकांसाठी 125 देशातील प्रतिनिधी भारतात आले. यानिमित्ताने देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्र शासित प्रदेशांच्या 60 शहरांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "जी 20' कार्यक्रमाला भारताच्या प्रत्येक राज्याला जोडून त्यांचा आत्मविश्वास वाढवला, त्याचबरोबर दिल्लीत पार पडलेल्या शिखर परिषदेच्या निमित्ताने जगाला भारताची विविधतेतील एकतेची संस्कृती दाखवत "वसुधैव कुटुंबकम' हा एकतेचा संदेश दिला. "जी 20'ची अध्यक्षता घेऊन जगाच्या पातळीवर आपल्या आर्थिक ताकदीसह इतर देशांना संस्कृतीही दाखवली. या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताने जगाच्या आशा-आकांक्षांना नवे पंख दिले आणि युद्धाऐवजी शांतता आणि सोहादांचा संदेशही दिला.
दिल्लीत झालेल्या "जी 20' शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत आता जागतिक मंचावर एक प्रभावशाली आणि शक्तिशाली देश म्हणून समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी देखील भारताच्या "जी 20' परिषदेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अवघ्या जगात लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. हेच या "जी 20' शिखर परिषदेत दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली "जी 20' परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच जगभरातील विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, प्रतिनिधी व इतर देशांचे आमंत्रित राष्ट्राध्यक्ष अशा शेकडो पाहुण्यांनी उपस्थित राहून भारत मंडपाची शोभा वाढविली, याबद्दल एक भारतीय नागरिक म्हणून मला या सर्वाचा अभिमान वाटतो.
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे