Advertisement
जुनी सांगवी : दापोडी, बोपोडीतील कै. चंद्रकांत छाजेड फाउंडेशनच्या वतीने 21 रुपयांत गणपती ही संकल्पना राबवत फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना 500 मूर्तीचे वाटप करण्यात आले. सर्व प्रकारच्या व दीड फुटांपासून अडीच फूट उंचीच्या मूर्ती 21 रुपयांत मिळत असल्याने दापोडी व बोपोडीत नागरिकांनी मूर्ती खरेदीस गर्दी केली होती. आमदार सिद्धार्थ शिरोळे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, आनंद छाजेड, रवींद्र साळगावकर, राजेश पांडे, धिरज घाटे, सुनील माने, प्रकाश ढोरे, सपना छाजेड, गणेश बगाडे, हर्षदा भोसले, अवंतिका भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मूर्तीचे वितरण करण्यात आले.
