Advertisement
राजकीय महिला आरक्षण
निर्णयावर बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई यांनी व्यक्त केली
प्रतिक्रिया
पुणे : नविन संसद भवनात कामकाजाची सुरू करत असतानाच आज महिला
आरक्षण विधेयकावर चर्चा झाली आणि देशाच्या पंतप्रधानांनी महिला आरक्षणाची बाजु
मांडत सदर विधेयकामुळे राजकारणात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण उपलब्ध होणार आहे, आज
देशातील समस्त मायबहिणींचा सन्मान करणारा निर्णय आदरणीय मोदींजींच्या पुढाकाराने
झाला आहे. त्या बद्दल त्यांचे शतशः आभार. अशा शब्दांत बहुजन रयत परिषदेच्या
प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
याबाबत ऍड. कोमलताई म्हणाल्या की, आज देशाच्या राष्ट्रपती एक महिला असतानाच आता
कनिष्ठ सभागृह आणि राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव असणार. सध्या
परिस्थिती मधे 82 महिला खासदार आहेत. या विधेयकानुसार तीच संख्या 179 होणार. म्हणजे
एकूण 543 खासदारांमधे 179 महिला खासदार असणार. आज संसदेत 2014 पासुन विरोधीपक्ष
नेता नाही. कारण, कोणत्याही विरोधी पक्षाकडे 10% पेक्षा अधिक जागा नाहीत. आता,
आदरणीय मोदीजींच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आलेत. त्या पक्षांनी यावर चिंतन
करण्याची गरज आहे.
महिला आरक्षणाचा निर्णय होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या समस्त
महिला वर्गाचे आराध्य दैवत भारतीय पहिल्या महिला व स्त्रीवादाची जननी सावित्रीबाई
फुले यांना हा निर्णय समर्पित केला पाहिजे. महिलांनी राजकारणाला करिअर म्हणून बघणं
गरजेचं आहे. या विधेयकाबद्दल एज्युकेटेड महिलांनी सकारात्मक दृष्टिकोनातून
प्राधान्य दिलं पाहिजे. शिवाय महिलांवर वाढत्या अत्याचारावर न्याय मागण्यापेक्षा
स्वतः सिस्टीम मध्ये येण्याची तयारी दाखवली पाहिजे. येत्या काळात पार्लमेंट मधे 179
महिला खासदार बसल्यानंतर एक समृद्ध जीवनशैली प्रत्येक महिलेला मिळणं सहज शक्य होईल
असा माझा विश्वास असल्याचेही ऍड. कोमलताई यांनी नमूद केले.
