Advertisement
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव हा नामांतराचा प्रश्न अखेर सुटला. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच औरंगाबाद विभाग आणि जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव जिल्हा असं नामांतर करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ शहराचं नामांतर झाले होते\ मात्र, महसूल कार्यालयांची नावं जुनीच होती. आता तीही नामांतरित झाली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयांना नामांतराबाबत आक्षेप मागवले होते या आक्षेपांची शहानिशा झाल्यानंतर नामांतराचा प्रश्न मार्गी लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अनावरण झाले छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले .