#

Advertisement

Wednesday, September 27, 2023, September 27, 2023 WIB
Last Updated 2023-09-27T11:55:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा सत्कार

Advertisement

भोसरी : राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या पक्षांकडूनही दखल घेतली जात असलेल्या काही निवडक संघटनांपैकी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या बहुजन रयत परिषदेचे नाव घेतले जाते. राजकीय पक्षाप्रमाणे धोरण तसेच कार्य आणि निवड पद्धती असल्याने परिषदेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्यांनाच योग्य त्या पदावर संधी दिली जाते. या पार्श्‍वभुमीवर नुकतीच कार्यकारिणीची बैठकी पुणे येथे झाली होती. त्यावेळी सर्वानुमते बहुजन रयत परिषेदेच्या प्रदेशाध्यक्षपदी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी निवड करण्यात आली. परिषदेच्या स्थापनेपासुन ते आतापर्यंत त्या बहुजनांच्या प्रश्‍न सोडविण्याकामी कार्यरत आहेत, गेल्या काही वर्षांत या परिषदेची संपुर्ण मा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सांभाळात आहेत. याच कारणातून त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानुसार वांबोरी ता. राहुरी, जि.नगर येथील महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डींग असोसिएशनचे जेम्स ससाणे, विशाल ससाणे, राजेंद्र घोरपडे, प्रमोद गुंजा आदी मान्यवरांच्या हस्ते ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया ऑलिम्पीकचे सदस्य अजय साळुंखे यांची विशेष उपस्थिती होती. परिषदेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही स्वागत, सत्कार केला.