Advertisement
भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन
सोलापूर : गणेशोत्सवात एकोपा जपला जातो, या निमित्ताने सर्व युवक एकत्र येत असतात. सर्वांना एकीच्या धाग्यात बांधणारा हा उत्सव आहे. आपल्याकडील अनेक गणेश मंडळांचे सामाजिक सलोख्यात चांगले योगदान राहिले आहे. सोलापूर परिसरातील सर्वच प्रमुख गणेश मंडळांसह अगदी छोट्या-मोठ्या गणेश मित्र मंडळांनीही सामाजिक भान जपल्याचे जाणवले, याचा मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.कोरवलीचा मानाचा गणपती श्री अष्टविनायक गणपतीची मिरवणूक सोमवारी (ता.25) सांयकाळी चार वाजता निघाली होती. या मिरवणुकीत सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने ढोबळे यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ शाल फेटा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री अमोगसिद्ध प्रशालेचे चेअरमन, प्राचार्य राजशेखर तात्या पाटील, बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य तथा कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटना संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, गंगाधर पाटील सर, बनसिद्ध म्हमाणे, लक्ष्मण पाटील, सदाशिव म्हमाणे, राहुल दसाडे, मल्लिनाथ पाटील, मंडळाचे अध्यक्ष करीम शेख, उपाध्यक्ष प्रशांत बोराळे, अक्षय माळगोंडे, अष्टविनायक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश दसाडे, प्रमोद पाटील यांच्या आदी उपस्थित होते.
माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष करीम शेख व उपाध्यक्ष प्रशांत बोराळे यांचा सत्कार करून ढोबळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला श्री अष्टविनायक तरुण मंडळातील सर्व आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते.