Advertisement
बहुजर
रयत परिषदेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती सोलापूर : बहुजन रयत परिषदेमध्ये आपण केलेल्या कामाची दखल घेतली जाते, यामुळेच मला जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळत आहे, अशी भावना योगेश येडाळे यांनी व्यक्त केली. सोलापूर शासकीय विश्रामगृहात बहुजन रयत परिषदेच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पदोन्नती छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी येडाळे यांनी आपली भावना व्यक्त केली. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेल्या सुचनेनुसार बहुजन रयत परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सदर नियुक्त पत्रांचे वितरण केले. यावेळी धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख योगेश येळाडे यांच्या कार्याची दखल घेत बहुजन रयत परिषद धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, कळंबचे ज्येष्ठ नागरिकांचे नेते गोरोबा ताटे, दतात्रय ऐडके, सुंदर ऐडके, खामसवाडीचे बाजीराव पाटोळे, प्रफुल्लता पाटोळे, अंकुश ऐडके, गोविंद ऐडके, देवानंद क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. | |||