#

Advertisement

Monday, September 4, 2023, September 04, 2023 WIB
Last Updated 2023-09-04T17:48:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

स्व. संजय ताकतोडे कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी द्या

Advertisement

 




माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

मुंबई : मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे, यासाठी बिड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील मौजे साळेगाव येथील संजय ज्ञानोबा ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मातंग समाजाचा संताप उफाळून आला होता, समाज बंधू आणि नातेवाईकांनी तीन दिवस मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार बीडचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या मदत निधीबाबत मागणीही केली होती. परंतु, अद्यापपर्यंत पिडीत ताकतोडे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालेली नाही, याचा विसर पडला काय? याबाबतचा पुनर्प्रस्ताव सादर करा, सदर मदत तातडीने मिळण्यासाठी कार्यवाही करा, अशी मागणी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री अवर सचिवांकडे दिले, यावेळी स्व. संजय ताकतोडे यांचे धाकटे बंधु आणि बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने दि.25/03/2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पिडीत कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याकरिता सदरील प्रस्ताव तपासून सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. परंतु, अद्यापपर्यंत पिडीत कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालेली नाही, पिडीत कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी, याबाबतचा पुनः प्रस्ताव तत्काळ सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ढोबळे साहेबांच्या प्रश्‍नांनी अधिकाऱ्याची पंचाईत...
केजचे तहसीलदारांनी स्व. संजय ज्ञानोबा ताकतोडे (रा. साळेगाव ता. केज, जि.बीड, जि.बीड) यांचा दि.05/03/2019 रोजीचा मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी घेतल्याबाबतचा अर्ज आपल्या कार्यालयाकडे आला आहे, त्याची प्रत आता तातडीने दाखवा, याबाबतचे काय कार्यवाही केली ती सांगा, सदर कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्याचा विचार होण्यासाठी अर्थसहाय्याचा सविस्तर प्रस्ताव विहीत प्रपत्रात सादर केलेला आहे. त्याबाबतचे काय झाले? असे प्रश्‍न माजी मंत्री लक्ष्णराव ढोबळे यांनी विचारताच संबंधीत अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली, अखेर खुर्चीवरून उठूवन त्यांनी ढोबळे आणि ताकतोडे यांच्या हस्ते निवेदन स्विकारले.